Posts

खुले आकाश

#समीर डायरी                        आज बरेच दिवसांनी माझ्या एका मित्राचा फोन आला ,लॉक डाऊन बाबत  विचारणा केली आणि काय करतोय हेही त्याने न रहता विचारल, तसा हा मित्र भटकंती करणारा पण पक्षी प्रेमी होता ,त्याने आपल्या घरात ८ लव बर्ड ,२ पोपट ठेवले होते तो रोज त्यांची काळजी घ्यायचा ,त्यांना काय झालं की हा अस्वस्थ असायचा, असाच एकदा गड भडकंती करताना रानात पक्षी आवाज फारच छान वाटला, तेव्हा तो म्हणाला "रानात पक्षाचे आवाज किती छान आणि सुंदर वाटतात,आणि मोहक वाटतं, हे आवाज सारखे एकावे असे वाटतं,म्हणून मला रानात भ्रमंती करावी वाटते" त्या वेळी त्याचा कडे बघून मी हसलो आणि एवढेच बोलून गेलो की "अरे ते मुक्त आहे त्यांना कसली चिंता नाही,बंधन नाही ,ते पाहिजे तिकडे फिरतात,"  "तुझ्या सारखं पक्षांना  पिंजऱ्यात नाही ठेवलं आहे" हे वाक्य त्याचा जिवारी लागलं तो कधी भेटला तरी मला शिव्या द्यायचा आला मोठा निसर्ग प्रेमी,                नेहमी चारचौघात   शिव्या देणारा मित्र ,फोन केला आज एकदम का बदली झाला!हा प्रश्न चिन्ह ?माझ्या पुढे उभा राहिला. मी ही नेहमी प्रमाणे मित्राची चौकशी केली